Tap to Read ➤
मध्यमवर्गीसांसाठी कार खरेदीचे खास सूत्र; अशी करा बजेट प्लॅनिंग
योग्य प्लॅनिंग करुन तुम्हीही तुमची ड्रीम कार घेऊ शकता.
कार खरेदी करणे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, भारतात यासाठी किमान पाच लाख रुपये लागतात.
प्रत्येकाकडे एवढे पैसे असतीलच असे नाही. काहीजण कर्ज घेतात, तर अनेकांची इच्छा असूनही कर्ज मिळत नाही.
तुमची कार खरेदीची इच्छा असेल, पण तुमच्याकडे पैसे नसतील, तर यासाठी फायनान्सच्या जगतात एक सूत्र आहे.
असे म्हटले जाते की, आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक रक्कम नवीन कार घेण्यासाठी खर्च करू नये.
समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे, तर तुम्ही कार खरेदीसाठी 5 लाखांपेक्षा जास्त खर्च करू नये.
बजेट बनवता कारची ऑन-रोड किंमत लक्षात घेऊन बनवले पाहिजे, कारण प्रत्यक्षात तुम्हाला कारची ऑन-रोड किंमत मोजावी लागते.
आणखी एक सूत्र आहे, जे कार लोनबद्दल सांगते. या सूत्राला 20/4/10 म्हणतात. हे देखील खूप लोकप्रिय आहे.
यानुसार कर्जावर कार खरेदी करताना, त्याच्या किंमतीच्या किमान 20% डाउन पेमेंट करा.
कारच्या कर्जाचा कालावधी चार वर्षांपेक्षा जास्त नसावा आणि EMI तुमच्या पगाराच्या 10% पेक्षा जास्त नसावा.
क्लिक करा