Tap to Read ➤

नितीशकुमार ते सचिन! ४ फलंदाज ज्यांची MCG वरील सेंच्युरी ठरली व्यर्थ

एक नजर टाकुयात अशा पाच फलंदाजांवर ज्यांच्या शतकी खेळीनंतरही टीम इंडियावर मेलबर्नच्या मैदानात ओढावली पराभवाची नामुष्की
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा युवा ऑलराउंडर नितीशकुमार रेड्डीनं शतकी खेळी केली. पण टीम इंडियाला या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्याची ही शतकी खेळी व्यर्थच ठरली.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कसोटी सामन्यात शतकी खेली व्यर्थ ठरणारा नितीश कुमार रेड्डी हा काही पहिला भारतीय फलंदाज नाही.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन अन् सेहवागचाही समावेश आहे. एक नजर टाकुयात अशा पाच फलंदाजांवर ज्यांच्या शतकी खेळीनंतरही टीम इंडियावर मेलबर्नच्या मैदानात ओढावली पराभवाची नामुष्की
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतून कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश कुमारनं मेलबर्नच्या मैदानात कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्याने पहिल्या डावात १८९ चेंडूत ११४ धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या पराभवामुळे त्याची क्लास शतकी खेळी व्यर्थ ठरली.
२००३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वीरेंद्र सेहवागनं मेलबर्नच्या मैदानात १९५ धावांची खेळी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला ९ विकेट्स राखून मात दिली होती.
१९९९ मध्ये मध्ये सचिनचं शतक म्हणजे टीम इंडियाचा विजय असा मोहाल असायचा. पण मेलबर्नच्या मैदानात ते घडलं नाही. १९१ चेंडूत ११६ धावांची खेळी करूनही टीम इंडियाला विजय मिळवता आला नव्हता. ३७६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया १९५धावांत आटोपली होती.
१९४८ मध्ये विनू मंकड यांनी MCG च्या मैदानात ३०९ चेंडूत १११ धावांची खेळी केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला एक डाव आणि १७७ धावांनी पराभूत केले होते.
१९४८ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातही विनू मंकड यांनी MCG च्या मैदानात ११६ धावांची खेळी केली. या सामन्यात टीम इंडियाला २२८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
क्लिक करा