Tap to Read ➤

ATM मधून पैसे आले नाही, पण खात्यातून कट झाले? लगेच करा 'हे' काम

कॅश निघाली नाही, तुमच्या खात्यातून पैसेही कट झाले, असं कधी तुमच्यासोबत घडलंय का?
कॅश निघाली नाही, तुमच्या खात्यातून पैसेही कट झाले, असं कधी तुमच्यासोबत घडलंय का?
तुम्ही एटीएममध्ये गेला असाल आणि कॅश निघाली नाही, तुमच्या खात्यातून पैसेही कट झाले, असं कधी तुमच्यासोबत घडलंय का? अशात काय करावं पाहू.
काही वेळा यामागे ठगांचाही हात असू शकतो. अशात तुम्हाला सतर्क राहण्याचीही गरज आहे.
काही वेळा तांत्रिक कारणांमुळेही एटीएममधून पैसे निघत नाही, पण अकाऊंटमधून पैसे कट होतात. असं झाल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही.
जर तांत्रिक कारणामुळे पैसे कट झाले असतील आणि तुम्हाला तर मिळाले नाहीत, तर अशात ते आपहून पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतात.
जमा न झाल्यास तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. बँक आपल्या ग्राहकांना २४ तास हेल्पलाईन सेवा पुरवते.
यानंतर तुमची समस्या नोट केली जाईल आणि तुमचा रेफरन्स नंबर रेकॉर्ड केल्यानंतर तुमची कम्प्लेंट रजिस्टर केली जाईल. तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबरही दिला जाईल.
रिझर्व्ह बँकेनुसार तुमच्या खात्यात सात दिवसांत ही रक्कम जमा होणं आवश्यक आहे. असं न झाल्यास नुकसान भरपाईचीही तरतूद आहे.
क्लिक करा