Tap to Read ➤
"मी एकटी आहे..."; गोविंदाच्या भाचीने केला पॅनिक अटॅकबद्दल खुलासा
"कधी कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला एकटं आणि सुन्न वाटतं, मी..."
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंहने बिग बॉस 13 मध्ये जाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली.
आरतीने 2007 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आणि अनेक डेली सोपमध्ये काम केलं.
सोशल मीडिया पोस्टमध्ये आरतीने तिच्या पॅनिक अटॅकबद्दल मोठा खुलासा केला आहे.
"कधी कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला एकटं आणि सुन्न वाटतं, मी माझ्या पॅनिक अटॅकबद्दल खूप मोकळपणाने बोलते."
"मला असं वाटतं की मी एकटी आहे आणि दररोज मी उठते आणि लढते."
"काळानुसार सर्वकाही बदलतं आणि ते ठीक आहे, कारण मला माहीत आहे की बरेच लोक यातून जात आहेत."
"फक्त हे सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाही आहात. कोणीतरी आहे जो तुम्हाला पाहत आहे."
"होय, तो देव आहे. तो हिंमत देतो. कोणाला काय वाटते याची मला पर्वा नाही."
"देव तुम्हाला आशीर्वाद देवो" असं आरती सिंहने म्हटलं आहे.
अभिनेत्रीने कॉमेडी सर्कससारखे अनेक कॉमेडी शो देखील केले आहेत.
क्लिक करा