Tap to Read ➤

राहुल गांधींनी बनवलं मराठमोळं जेवण; वांग्याचं भरीत, तुरीची डाळ अन्...

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधींचं वेगळेच रुप लोकांना अनुभवायला मिळालं
नुकतेच काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते.
कोल्हापूरात छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
मात्र राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच त्यांनी कुठल्याही हॉटेलवर न जाता एका गरीब टेम्पोचालकाच्या घरी गेले.
उचगावातील टेम्पोचालक अजित संधे यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
केवळ चर्चाच नाही तर राहुल गांधी त्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन मराठमोळं जेवणही बनवलं.
हरभऱ्याची भाजी, वांग्याचं भरीत, तुरीची डाळ व भाकरी बनवत राहुल यांनी संधे कुटुंबियांसोबत जेवण केले
राहुल गांधी यांच्या या कृतीने अनेक लोकांची मने जिंकली, काँग्रेस नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले.
क्लिक करा