Tap to Read ➤

तारीख अन् वेळही ठरली! 'या' दिवशी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येणार

सुनीता विल्यम्स गेल्या ९ महिन्यांपासून सहकाऱ्यांसोबत अंतराळात आहेत
त्यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सचं क्रू १० यान अंतराळ स्थानकात पोहोचलं आहे
हे यान पृथ्वीवर कधी उतरणार याची तारीख आणि वेळही ठरली आहे, नासाने यासंदर्भात ट्वीट केलं आहे
अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, १८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी यान पृथ्वीवर येईल
तर भारतीय वेळेनुसार, बुधवारी म्हणजे १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर उतरतील
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघंही अंतराळवीर नासा तर्फे ५ जून २०२३ रोजी स्पेस स्टेशनला गेले होते.
त्यांचं ८ दिवसांचं मिशन ९ महिन्यांपर्यंत लांबलं. यादरम्यान त्यांनी अंतराळात अनेक प्रयोग केले.
क्लिक करा