Tap to Read ➤

साप्ताहिक राशीभविष्य: सर्वोत्तम संधी, अपार यश; धनलाभ, तुमची रास कोणती?

आगामी आठवडा कसा असेल? जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य...
या सप्ताहात राशीपालट नाहीत. गुरु, राहु, हर्षल मेषेत, शुक्र कर्केत, रवी-बुध सिंहेत, मंगळ कन्येत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. तिसरा श्रावणी सोमवार, तिसरी मंगळागौर आहे. भगवान श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, गोपालकाला, भगवान श्रीकृष्ण जयंती (वैष्णव) आहे.
मेष: प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत पदोन्नतीची संभावना. काम अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात लाभ होईल.
वृषभ: प्राप्तीत वाढ झाल्याने मन आनंदून जाईल. नोकरीत पूर्ण उत्साहाने व जोशाने कामे कराल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात नफा होईल.
मिथुन: कामात चांगली गती असल्याचे दिसून येईल. वरिष्ठ कामाच्या पद्धतीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांनी कामावर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.
कर्क: विवाहितांना आठवडा अत्यंत चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. फायदा होऊ शकतो.
सिंह: परिश्रम यशस्वी होऊन सुखद परिणाम मिळतील. वरिष्ठांशी उत्तम समन्वय साधू शकाल. व्यापाऱ्यांना एखादा नवीन व्यापारी सौदा मोठा लाभ देईल.
कन्या: प्रेमिकेस एखादी मोठी भेटवस्तू देऊ शकता. काही महत्वाच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची संभावना आहे. नोकरीत प्रयत्नरत राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.
तूळ: विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन जोडीदाराशी जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती चांगली राहील. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते.
वृश्चिक: सावध राहावे. मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. कोणाला उसने पैसे देऊ नये. नोकरदारांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे.
धनु: वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरीत स्थिती चांगली. नशिबाची साथ मिळाल्याने पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना कष्टांचे यथायोग्य फळ मिळेल. फायदा होऊ शकेल.
मकर: कौटुंबिक सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यापाऱ्यांना प्रवास केल्याने लाभ होईल.
कुंभ: नोकरीत परिश्रम करावे लागतील. पदोन्नती मिळण्याची संभावना. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल.
मीन: वैवाहिक सौख्य लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. प्राप्तीत वृद्धी. व्यापारात चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. विरोधकांवर मात कराल.
क्लिक करा