Tap to Read ➤

शुभ-लाभ होईल! १० राशींना गणेशोत्सव दमदार, बाप्पा कृपेने व्हाल मालामाल

आगामी गणेशोत्सवाचा काळ कसा असेल? जाणून घ्या...
१८ सप्टेंबर हरितालिका, १९ सप्टेंबर गणेश चतुर्थी (अंगारकी योग), २० सप्टेंबर ऋषि पंचमी, २१ सप्टेंबर गौरी आवाहन (महालक्ष्मी), २२ सप्टेंबर गौरी पूजन, २३ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन.
आर्थिक आघाडी, करिअर, कुटुंब, व्यवसाय, बिझनेस, शिक्षण यांसाठी आगामी काळ कसा असेल? जाणून घ्या...
मेष: नोकरीत स्थिती अनुकूल असेल. विरोधकांवर मात करू शकाल. पदोन्नतीचा मार्ग सोपा होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ: मन हर्षित होईल. प्राप्तीत वाढ. आर्थिक स्थितीत सुधारेल. व्यापारात फायदा झाल्याने खुश व्हाल. खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
मिथुन: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत लाभ. व्यापारात स्थिती मजबूत होईल. सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ. नोकरीतील स्थिती अनुकूल.
कर्क: सासुरवाडीकडील लोक पाठीशी राहून समजून घेतील. लोक आदर करतील. पगारवाढ संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. खुश होतील.
सिंह: एखादे साहस करण्याचा विचार कराल. मित्रांसह फिरावयास जाऊ शकता. व्यापाऱ्यांना फायदा होण्याची संभावना. नोकरदारांना काही त्रास जाणवू शकतो.
कन्या: प्रॉपर्टीत केलेल्या गुंतवणुकीतून लाभ. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल. व्यापाऱ्यांच्या हाती एखादी मोठी ऑर्डर लागू शकते. दिलासा मिळेल.
तूळ: एखादे नवीन वाहन, जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी व्हाल. घरातील वातावरण सकारात्मक. प्राप्तीत वाढ होईल. सरकारी क्षेत्राकडून लाभ होईल.
वृश्चिक: अचानक धनलाभ संभवतो. यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल. पदोन्नती संभवते. व्यापारात यशस्वी व्हाल. प्रगती साधू शकाल.
धनु: पद-प्रतिष्ठेत वृद्धी होईल. प्राप्ती वाढेल. खुश व्हाल. कामानिमित्त परदेशाशी चांगला संपर्क साधू शकाल. वेळेचा फायदा उचलून व्यापार वृद्धी करावी. गुंतवणुकीतून लाभ.
मकर: प्राप्ती वाढेल. आर्थिक आव्हानातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव कमी होतील. नोकरीत बदली होण्याची संभावना. व्यापारात यश मिळेल.
कुंभ: काही त्रास होऊ शकतो. पूर्णत्वास आलेल्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. परंतु धीर सोडू नका. हळूहळू सुधारणा होऊ लागेल. व्यापारी मोठी गुंतवणूक करतील.
मीन: आर्थिक नियोजन कौशल्यपूर्वक करावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी अनुकूल काळ. नोकरदारांनी वेळेचा फायदा उचलावयास हवा. विद्यार्थ्यांसाठी काळ उन्नतीदायक.
क्लिक करा