Tap to Read ➤

राशीभविष्य : कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल.
आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल.
आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल.
आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोट्या प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील.
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील.
आज घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल.
आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील.
आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या.
आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल.
वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा.
आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील.
क्लिक करा