आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ भारतीय गोलंदाज
अर्शदीप सिंग ते जसप्रीत बुमराह आघाडीच्या पाच गोलंदाजांमध्ये कुणाच्या खात्यात किती विकेट्स?
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आता अर्शदीप सिंगच्या नावे झाला आहे.
६१ व्या टी२० सामन्यात त्याने ९७ विकेट्सचा आकडा गाठला. इथं एक नजर टाकुयात या यादीतील भारताच्या आघाडीच्या चार गोलंदाजांवर...
अर्शदीप सिंग याने आतापर्यंत ९७ विकेट्स घेतल्या असून इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो या फॉर्मेटमध्ये त्याला भारताकडून शंभर विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त ३ विकेट्सची गरज आहे.
भारतीय संघाबाहेर असलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहल याने ८० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ९६ विकेट्स घेतल्या आहेत.
भुवनेश्वर कुमार याने ८७ टी-२० सामन्यात ९० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत .
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह छोट्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंतच्या ७० सामन्यांमध्ये ८९ बळी टिपले आहेत.
हार्दिक पांड्याच्या खात्यात ११० सामन्यात ९१ विकेट्सची नोंद आहे.