२ रुपयांत जेवण अन् ६ रुपयांचे कपडे, अभिनेत्रीने पाहिलेला कठीण काळ
अभिनेत्रीने सांगितले तिच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल
अर्चना पूरण सिंगने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नुकतेच तिने स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगितले.
अर्चना पूरण सिंगने बॉलिवूडसोबतच टीव्हीमध्येही काम केले आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ती २ रुपयात जेवण खायची.
अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये रणवीर शौरी आणि विनय पाठक यांच्याशी चर्चा केली आणि तिचे जुने दिवस आठवले. तिने सांगितले की, पूर्वी ती भाड्याच्या घरात राहायची. तिच्याकडे टीव्ही नव्हता. ती तिच्या घरमालकाला 10 वाजता टीव्ही चालू करण्यास सांगायची जेणेकरून तिला तिचा कार्यक्रम पाहता येईल.
कधी कधी ते परवानगी द्यायचे, तर कधी नकारही द्यायचे. त्यामुळे अर्चनाने तिच्या शोचे फार कमी एपिसोड पाहिले आहेत.
तिने पुढे सांगितले की, एक वेळ होती जेव्हा ती फक्त २ रुपयात जेवण करायची. डाळ १ रुपयाला तर चपाती १० पैशांना मिळत होती. ती १ रुपयांची डाळ आणि १० चपाती विकत घ्यायची. त्या १० चपात्या कागदासारख्या पातळ असायच्या.
अर्चना पूरण सिंगने सांगितले की, अनेकवेळा ती ऑडिशन देण्यासाठी बसऐवजी पायी जायची. ती म्हणाली की, त्यावेळी बसचे तिकीट ५० पैसे होते. ते पैसे वाचवून ती ६ रुपयांचे टी-शर्ट विकत घ्यायची.
संघर्षाच्या दिवसांत अशाच अडचणीत जगावे लागलेल्या अर्चना पूरण सिंग आता करोडोंची मालकीण आहे. ती विलासी जीवन जगते आहे.
अर्चना पूरण सिंगने काही काळापासून व्लॉग बनवण्यास सुरुवात केली आहे. जे लोकांना खूप आवडत आहेत.
व्लॉगमध्ये अर्चना पती आणि दोन मुलांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.