Apple पहिल्यांदाच बंद करणार आपला 'हा' बिझनेस, 'हे' आहे कारण
त्यांनी २०१९ मध्ये हा करार केला होता...
प्रसिद्ध Apple या कंपनीनं पहिल्यांदाच आपला एखादा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
कंपनीनं गोल्डमॅन सॅशसोबतची क्रेडिट कार्ड पार्टनरशिप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही सेवा पुढील १२ ते १५ महिन्यांमध्ये बंद केली जाईल. अॅपल आणि गोल्डमॅन सॅश यांनी २०१९ मध्ये करार केला होता.
हा करार २०२९ पर्यंत होता. परंतु अॅपलनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये या वर्षी सुरू झालेल्या सेव्हिंग्स अकाऊंट प्रोग्रामचाही समावेश आहे.
रिपोर्टनुसार गोल्डमॅन सॅशला गेल्या वर्षी या करारामुळे १ अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झालं आहे.
हे अशा वेळी झालंय जेव्हा अमेरिकेत क्रेडिट कार्ड डेट विक्रमी पातळीवर पोहोचलंय. ब्लूमबर्गनुसार अॅपलला हा करार सुरू ठेवायचाय, परंतु गोल्डमॅन सॅशला यातून बाहेर पडायचं आहे.
मार्केट कॅपच्या हिशोबानं अॅपलही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचं मार्केट कॅप २.९५४ ट्रिलियन डॉलर्स आहे.