अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली ही आदर्श जोडी आहे.
दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करतात आणि प्रेम करतात.
"इंडिया टुडे"ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत अनुष्काने भारतात घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य केलं होतं.
अनुष्काने म्हटलं,"दोन व्यक्तींमधील समीकरण पूर्वीसारखे राहिलेलं नाही, ते खूप बदललं आहे, आता महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. आता त्यांना लग्नानंतर राहण्यासाठी घर नाही तर जोडीदारासोबत चांगली भागीदारी हवी आहे".
ती म्हणाली, "महिलांना त्यांच्या जोडीदारासोबत वाढायचं आहे. त्यांना कोणत्याही दबावाखाली जीवन जगायचं नाहीये. महिला जास्त सहन करत नाहीत, त्यांची विचारसरणी बदलली आहे".
अनुष्का म्हणते, "लग्नानंतर लोकांमध्ये अनेकदा धीर नसतो आणि ते गोष्टी सोडून देतात. यामुळे लग्न तुटते".
अभिनेत्रीच्या मते, एकदा लग्न झाले की, तुम्हाला त्यावर काम केलं पाहिजे. नात्यात स्वीकृती खूप महत्वाची असते, जी व्हायलाच हवी".
अनुष्का म्हणते, "कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. तुम्ही नात्याला वेळ दिला पाहिजे आणि दोघांनीही नात्यावर काम केले पाहिजे".