Tap to Read ➤
आवळा की, कोरफड: केसांसाठी काय फायदेशीर?
केसांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर काय आहे आवळा की, कोरफड
कोरफड आणि आवळा दोघांमध्येही अनेक गुणधर्म आहेत. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेकदा याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो.
परंतु, कधी विचार केला आहे का? केसांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर काय आहे. चला जाणून घेऊया.
आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. याचा वापर केल्याने केसांच्या वाढीस मदत होते.
कोरफडमध्ये फॉलिक ॲसिड, बीटा कॅरेटीन, व्हिटॅमीन सी, ई, ए, बी १२ आणि अँटी - इंफ्लेमेटरीने समृद्ध असलेले कोरफड केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका करते.
आवळा आणि कोरफड दोन्ही गोष्टी केसांना फायदेशीर ठरतात. परंतु, केसांच्या समस्यांनुसार याचा वापर करायला हवा.
केस खूप कोरडे असतील तर कोरफडीचा गर लावा. यामुळे टाळू देखील निरोगी राहिल.
केसांना मुळांपासून मजबूत करायचे असेल तर आपण आवळ्याचा हेअर पॅक बनवून लावू शकतो. यामुळे केस लांब आणि जाड होतील.
टाळू निरोगी ठेवण्यासाठी कोरफडचा वापर करु शकता. टाळूशी संबंधित समस्यांपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल.
आवळा आणि कोरफड दोन्ही केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.
क्लिक करा