महागडी वाटणारी खसखस आरोग्यासाठी आहे सुपरफूड
सणवार आले की प्रत्येकाच्या घरात खसखशीचं लहानसं पाकीट सहज दिसून येतं.
खरेदी करतांना महाग वाटणारी ही खसखस आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. त्याचे काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.
खसखशीच्या आवरणात असलेल्या तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. तसंच खसखसमुळे कोलेस्ट्रॉलची समस्याही कमी होते.
खसखस वाटून अंगाला लावल्यास त्वचा मृदू होते.
दोन चमचे खसखस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते.
हाडांच्या मजबुतीसाठी आणि योग्य वाढीसाठी खसखस खाणे फायदेशीर ठरते.
खसखसच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याविषयी लोकमत कोणताही दावा करत नाही.)