Tap to Read ➤

१४ शेअर्स 'फ्री' देणार ही कंपनी, ₹२७ वरून ₹३४६ वर आला भाव

गुंतवणूकदार मालामाल, शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर
आयटी कंपनी अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडचे शेअर्स गेल्या काही सत्रांपासून चर्चेत आहेत. अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडचे शेअर्स सातत्याने उत्तम परतावा देत आहेत.
गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडच्या शेअरनं आज ५ टक्क्यांचा तेजीसह ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ३४६.०५ रुपयांचा स्तर गाठला.
शेअर्सच्या या वाढीमागे एक घोषणा आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळानं १४:४८ या प्रमाणात बोनस शेअरला मंजुरी दिली आहे. म्हणजेच पात्र भागधारकांना ४८ शेअर्ससाठी १४ शेअर्स मोफत बोनस म्हणून मिळणार आहेत.
कंपनीचा शेअर जबरदस्त परतावा देत आहे. गेल्या पाच दिवसांत त्यात २८ टक्के वाढ झाली आहे. महिनाभरात हा शेअर १८० टक्क्यांनी वधारला आहे.
सहा महिन्यांत हा शेअर ५०० टक्क्यांनी वधारला. या दरम्यान त्याची किंमत ५७ रुपयांवरून सध्याच्या किमतीत वाढली. ५ महिन्यांत हा शेअर ४११ टक्क्यांनी वधारलाय.
वर्षभरात १,११५.९२ टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत २८ रुपये होती. शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ३४६.०५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २७.०१ रुपये आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
क्लिक करा