Allu Arjun House: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला नुकताच 'पुष्पा: द राईज' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
Allu Arjun House: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राईज' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज आम्ही तुम्हाला अल्लूच्या आलिशान बंगल्याची इनसाईट फोटो दाखवणार आहोत...
अल्लू अर्जुनचे हे राजवाड्यासारखे घर हैदराबादच्या पॉश जुबली हिल्स भागात आहे. तो त्याच्या कुटुंबासह या अनेक एकरावर पसरलेल्या आलिशान घरात राहतो.
अल्लूसोबत, त्याची पत्नी, दोन मुले अयान आणि अरहा आणि त्याचे आई-वडील या घरात राहतात. अल्लूने त्याच्या आलिशान घराचे नाव ब्लेसिंग ठेवले आहे.
अल्लू अर्जुनचा हा बंगला पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा आहे, जो हुबेहुब रॉयल पॅलेससारखा दिसतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या घराची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.
अल्लू अर्जुनच्या घरात तुम्हाला अँटीक फर्निचरसह लक्झरी सुविधा पाहायला मिळतील. याशिवाय घरात एक मोठा पूलही बांधला आहे.
याशिवाय या आलिशान घरात एक मोठी बागदेखील आहे, ज्यात अल्लू अनेकदा स्वतः गार्डिनींग करतो. याचे फोटोही अनेकदा समोर आले आहेत.
अल्लू अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना त्याच्या घराची झलक दाखवतो.
अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपटाने देशभरात धुमाकुळ घातली होती. आता या सिनेमाचा पुढचा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.