Tap to Read ➤

अजय देवगन आणि काजोलचा घटस्फोट होणार होता, पण...

अजय देवगन आणि काजोल हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जो़डप्यांपैकी एक आहेत. मात्र एकदा त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली होती.
या दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चांमुळे फॅन्सना धक्का बसला होता. बॉलिवूडमधील या चर्चित जोडप्यामध्ये नेमकं काय झालं, असा प्रश्न त्यांना पडला होता.
मात्र अखेरीस अजयने एक फॅमिली फोटो शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता.
ही केवळ अफवा असल्याचे पुढे समोर आले होते. मात्र फॅन्स हे अद्यापपर्यंत विसरलेले नाही.
हल्लीच अजय देवगन आणि काजोल गदर-२ च्या सक्सेस पार्टीमध्ये पोहोचले, तेव्हा फॅन्सना या गोष्टीची आठवण झाली.
ब्लॅक कुर्ता आणि पायजमा घातलेला अजय आणि साडी नेसलेली काजोल पार्टीमध्ये खूप सुंदर दिसत होती.
या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये फॅन्सनी या दोघांच्या नात्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांना खूप सुनावले. यांच्या मनात आलं तर ते कुणाचही नातं तोडू शकतात अशी टीका फॅन्सनी केली.
वर्कफ्रंटचा विचार केल्यास काजोल हल्लीच द ट्रायल या वेबसिरीजमध्ये दिसली होती. तर अजय देवगणचा भोला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
क्लिक करा