Tap to Read ➤
Airtel नं लाँच केले स्पेशल प्लॅन्स, ९९ रुपयांत अनलिमिटेड डेटा
कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोत दोन स्पेशल प्लॅन्स जोडले आहेत.
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. परंतु कंपनीनं आता या यादीत आणखी दोन स्पेशल प्लॅन्स जोडले आहेत.
क्रिकेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हे प्लॅन्स लाँच करण्यात आलेत. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अधिक डेटा देण्यात येणार आहे.
सामन्यांदरम्यान युझर्सचा डेटा संपू नये आणि एन्टरटेन्मेंटमध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी हे प्लॅन्स लाँच करण्यात आलेत.
कंपनीनं ९९ रुपये आणि ४९ रुपयांचे दोन प्लॅन्स लाँच केले आहे. हे दोन्ही डेटा व्हाऊचर्स आहेत. अतिरिक्त डेटा म्हणून तुम्ही ते वापरू शकता.
९९ रुपयांच्या डेटामध्ये ग्राहकांना दोन दिवसांची वैधता मिळते. या कालावधीत अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
तर ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका दिवसासाठी ६ जीबी डेटा मिळेल. या प्लॅन्ससोबत कंपनीनं डीटूएचबाबतही घोषणा केलीये.
एअरटेल डिटूएचसाठीही कंपनीनं विशेष प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये युझर्सना स्टार स्पोर्ट्सच्या पोर्टफोलियोचा अॅक्सेस मिळेल.
५ तारखेपासून वर्ल्ड कपच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण डिस्ने+ हॉटस्टारवर पाहायला मिळतंय. सध्या मोबाईलवर हे मोफत पाहता येतंय.
क्लिक करा