Tap to Read ➤

भारतात मिळणार Starlink चे हायस्पीड इंटरनेट; Airtel चा SpaceX सोबत करार

देशभरात मिळणार Elon Musk यांच्या स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट.
देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel ने एक मोठी घोषणा केली आहे. एअरटेल इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीशी करार करणार आहे, ज्या अंतर्गत देशभरात स्टारलिंकच्या निवडक सेवा दिल्या जाणार आहेत.
इलॉन मस्क भारतात झपाट्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्न करत आहेत. आधी त्यांनी त्यांची EV कंपनी Tesla चे भारतात शोरूम उघडण्याच्या प्रक्रियेला गती दिली. आता एअरटेलसोबत स्टारलिंक सेवेचा करार केला आहे.
एअरटेलचे म्हणणे आहे की, कंपनीने Starlink चे हाय-स्पीड इंटरनेट भारतात आणण्यासाठी SpaceX सोबत करार केला आहे. हा अशा प्रकारचा पहिला करार आहे. पण, कंपनी जेव्हा भारतातील सर्व नियामक मान्यता प्राप्त करेल तेव्हाच स्टारलिंक सेवा सुरू करेल.
एअरटेल आणि स्टारलिंकच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्यांनी 11 मार्च रोजी अधिकृतपणे करारावर स्वाक्षरी केली आहे. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर एअरटेल भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करेल.
स्टारलिंकमधील भारताची ही पहिलीच भागीदारी आहे. एअरटेल देशभरात पसरलेल्या त्यांच्या स्टोअरमधून स्टारलिंक सेवा देईल. यामध्ये स्टारलिंक उपकरणांचाही समावेश करण्यात येणार आहे.
एअरटेलचे म्हणणे आहे की, त्यांची Eutelsat OneWeb सोबत आधीपासूनच भागीदारी आहे. या नवीन भागीदारीमुळे एअरटेल ग्राहकांना अधिक पर्याय देऊ शकणार आहे. विशेषत: ज्या भागात सध्या पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी सेवा अधिक चांगली होईल.
भारती एअरटेलचे एमडी आणि व्हाईस चेअरमन गोपाल विट्टल म्हणतात की, स्पेसएक्सशी करार करून भारतात स्टारलिंक सेवा प्रदान करणे ही एक नवीन सुरुवात आहे. हे भारतात नेक्स्ट जनरेशन कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते.
स्टारलिंकसोबत एअरटेलच्या डीलमुळे टेलिकॉम मार्केटमध्ये जिओला तगडी स्पर्धा मिळणार आहे. सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ इन्फोकॉम आहे.
क्लिक करा