Airtel ची धमाकेदार ऑफर! १९५ रुपयांचा प्लॅन लाँच; पाहा काय आहे खास?
एअरटेल सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स लाँच करत असते.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेल सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीनं आता ग्राहकांसाठी आणखी एक नवा प्लॅन आणला आहे.
ग्राहकांना आता विमानाच्या आतही कॉल. एसएमएस आणि इंटरनेटचा आनंद घेता येईल. यासाठी कंपनीनं फ्लाईट इन रोमिंग प्लॅन सादर केलाय.
याची किंमत १९५ रुपयांपासून सुरू होते. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक विमान प्रवासादरम्यान हाय स्पीड इंटरनेट ब्राऊसिंगचा आनंद घेऊ शकतात.
२९९७ चं रोमिंग पॅक असलेले प्रीपेड ग्राहक आणि ३९९९ रुपयांचे किंवा अधिकचे पोस्टपेड ग्राहक अतिरिक्त शुल्काशिवाय इन फ्लाईट रोमिंगचा लाभ घेऊ शकतात.
पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांना २५० एमबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स यासह २४ तासांच्या वैधतेसह १०० आउटगोइंग एसएमएससाठी १९५ रुपये द्यावे लागतील.
२९५ रुपयांमध्ये, ग्राहकांना ५०० एमबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स, तसंच २४ तासांच्या वैधतेसह १०० आउटगोइंग एसएमएस मिळतील.
५९५ रुपयांमध्ये, एअरटेल ग्राहकांना २४ तासांच्या वैधतेसह १ जीबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स, १०० आउटगोइंग एसएमएस देत आहे.