सेलिब्रिटी लग्नात लेहेंग्याची गोडी; पण सिंधूनं निवडली सिल्कची साडी
भारताची स्टार बॅडमिंटनपटू नुकतीच विवाह बंधनात अडकली. सिंधूनं आपल्या लग्नात टॉप ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा संस्कृती अन् परंपरा जपण्याचा ट्रेंड सेट केला.
सेलिब्रिटींच्या लग्नाचा लूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सध्याच्या घडीला सेलिब्रिटींमध्ये लग्नाचा लूक खास करण्यासाठी महागड्या लेहेंग्याची क्रेझ पाहायला मिळते.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू नुकतीच विवाह बंधनात अडकली. ती देखील एक लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. अनेकदा तिने लेहेंग्यातील खास लूकही दाखवून दिला आहे. त्यामुळे तिचा लग्नातील लूक कसा असेल? याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
सेलिब्रिटींमधील लेहेंग्याच्या टॉप ट्रेंडची आवड असल्याचे सिंधूनं अनेकदा दाखवून दिले असले तरी स्वत:च्या लग्नात टॉप ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा संस्कृती अन् परंपरा जपण्याचा ट्रेंड सेट करण्याला फुलराणीनं पसंती दिल्याचे दिसून आले.
फुलराणीनं पी.व्ही. सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील उदयपूर येथील लेक सिटीच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल राफेल्समध्ये पार पडला. सिंधून लग्नात सिल्कच्या साडीला पसंती दिल्याचे पाहायला. मिळाले. तिचा लग्नातील पारंपारिक लूक एकदम खास अन् झक्कास असाच आहे.
लग्नाआधी सिंधूने व्यंकट दत्ता साईसोबतचा एक खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला होता. पण लग्नाचे फोटो तिने अद्याप शेअर केलेले नाहीत.
सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्या लग्नातील एक खास फोटो केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोत सिंधूची लग्नातील खास झलक पाहायला मिळते.
सिंधूच्या लग्नातील हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.