Tap to Read ➤
अधिक मास: बाप्पाला ५ गोष्टी अर्पण करा, शुभ-लाभ मिळवा
अधिक मासात बाप्पाची कृपा मिळण्यासाठी नेमके काय करावे?
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता, प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते.
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन कोट्यवधी घरांमध्ये केले जाते.
बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. अधिक मासात गणेश पूजन, नामस्मरण पुण्यदायी मानले आहे.
सुमारे तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो. २०२० नंतर आता २०२३ मध्ये अधिक महिना आला आहे. यंदा श्रावण अधिक आहे.
बाप्पाच्या पूजन, नामस्मरणासह बाप्पाच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास अपार लाभ मिळू शकतो, अशी मान्यता आहे.
अधिक मासात मंगळवारी व चतुर्थी व्रतपूजन विशेष मानले गेले आहे. बाकी काही करता आले नाही तरी ५ गोष्टी बाप्पाला आवर्जून अर्पण कराव्या.
गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. या दिवशी आवर्जून एक लाल फूल गणपतीला वाहावे.
गणेशाला मोदक प्रिय आहेत. अनेक घरांमध्ये मोदकचा नैवेद्य दाखवला जातो. अधिक मासात मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवा.
गणपती बाप्पाला लाडू विशेष प्रिय आहेत. मोदक करणे शक्य नसल्यास लाडवाचा नैवेद्य गणेशाला दाखवावा, असे सांगितले जाते.
दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. अन्य काहीच नसेल अन् केवळ एक दुर्वा अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे पुण्य मिळते.
तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ॐ सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप यथाशक्ती करावा.
अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र २१ वेळा किंवा ११ वेळा म्हणावे. अगदीच शक्य नसेल तर किमान एक वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे.
अधिक मासातील गणेश व्रते विशेष मानली गेली असून, यामुळे गणपतीची अपार कृपा, शुभ-लाभ मिळू शकतो, असे म्हटले जाते.
ॐ गं गणपतये नम: गणपती बाप्पा मोरया...
क्लिक करा