Tap to Read ➤

आधार अपडेटपासून इन्कम टॅक्सपर्यंत, मोफत होतायत ही महत्त्वाची कामं

२०२४ मध्ये काही महत्त्वाच्या कामांची डेडलाईन पूर्ण होणार आहे. त्यामुळे पटापट पूर्ण करा ही कामं.
मोफत आधार अपडेटपासून ते इन्कम टॅक्स नियम आणि डीमॅट खात्याच्या नॉमिनीपर्यंत, पैशांशी संबंधित अनेक कामांसाठी मुदत वाढवण्यात आली आहे.
जर तुमचं आधार कार्ड १० वर्ष जुनं असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता. सरकारनं १४ मार्च पर्यंत आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा सेंटरवर जाऊन ते अपडेट करू शकता.
जर तुम्ही ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक मंथली घरभाडं भरत असाल आणि संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये टीडीएस कापला नसेल. तर मार्च २०२४ मध्ये भाडं भरून टीडीएस वजा करा.
जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कर बचतीची योजना आखत असाल, तर सर्व कर बचत गुंतवणूक ३१ मार्च पूर्वी करावी लागेल. तुम्ही जुन्या कर प्रणाली अंतर्गत या सवलतींचा दावा करू शकता.
अनेक बँकांनी विशेष फिक्स्ड डिपॉझिट स्की आणल्या आहेत, ज्यांची अंतिम मुदत या वर्षी संपत आहे. एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर एफडीची अंतिम मुदत १० जानेवारी आहे. त्याचप्रमाणे, SBI WeCare FD ची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.
डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत डीमॅट खात्यात नॉमिनी जोडता येईल. जर हे काम केलं नाही तर तुम्ही ट्रेडिंग करू शकणार नाही.
आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, सर्व करदात्यांनी ३१ जुलैपूर्वी आयकर रिटर्न भरले पाहिजेत. आयकर विभागानं यासाठी ITR-1, ITR-2 आणि ITR-4 जाहीर केले आहेत.
क्लिक करा