जगातील सर्वात घातक ५ क्षेपणास्त्र

काही क्षेपणास्त्रे त्यांच्या मारक क्षमता, वेग आणि तंत्रज्ञानामुळे सर्वात धोकादायक मानली जातात.

आरएस-२८ सरमत (RS-28 Sarmat) हे रशियाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. 

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १८,००० किलोमीटरपर्यंत असून एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेऊ शकते.

डीएफ-४१ (DF-41) हे चीनचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. 

याची मारक क्षमता अंदाजे १२,००० ते १५,००० किलोमीटर आहे.

मिन्युटमन ३ (Minuteman III) हे अमेरिकेचे जमिनीवरून मारा करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. 

याची मारक क्षमता १३,००० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

पॉसायडन (Poseidon) हे रशियाचे एक अनोखे आणि धोकादायक शस्त्र आहे. 

हा एक अणुशक्तीवर चालणारी मानवरहित पाणबुडी ड्रोन आहे.

एम५१ (M51) हे फ्रान्सचे पाणबुडीतून मारा करणारे बॅलिस्टिक आहे. 

याची मारक क्षमता अंदाजे ८,००० ते १०,००० किलोमीटर आहे.

Click Here