डॉक्टरांचे हस्ताक्षर वाचणे केवळ कठीणच नाही तर कधीकधी जवळजवळ अशक्यही असते. सोशल मीडियावर डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर मीम्सही तयार करण्यात येतात.
अनेक देशांमध्ये प्रिस्क्रिप्शन चुकीचे वाचले गेल्यामुळे रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी अनेक लोकांना भेडसावत आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी आणि कामाच्या ताणामुळे डॉक्टर इतके वेगाने लिहितात की अक्षरे वाचणे कठीण होते, जे सामान्य लोकांना सहज समजत नाही.
भारतात, न्यायालयांनी डॉक्टरांच्या हस्ताक्षराबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांचे अस्पष्ट हस्ताक्षर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते असं न्यायालयाने म्हटलं.
१९९९ च्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये वैद्यकीय चुकांमुळे दरवर्षी सुमारे ४४,००० मृत्यू होतात, त्यापैकी सुमारे ७,००० मृत्यू केवळ खराब हस्ताक्षरामुळे होतात.
भारतासारख्या रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यामुळे डॉक्टरांना वेळेची कमतरता आणि कामाच्या ताणामुळे लवकर लिहावे लागते. यामुळे खराब हस्ताक्षर काढले जाते.
अॅलोपॅथिक डॉक्टर अनेकदा औषधांची नावे लिहिण्यासाठी खास शब्द वापरतात. हे कमिशन मिळविण्यासाठी असते असं काहींचे म्हणणे आहे.मात्र काही डॉक्टर व्यस्त असल्याने असे करतात.