'कांतारा' फेम रुक्मिणी वसंत

कांतारा फेम अभिनेत्रीची अनटोल्ड स्टोरी

रुक्मिणी वसंत हिने 'कांतारा चॅप्टर १'मध्ये राजकुमारी कनकावरतीची भूमिका साकारली आहे. पण तिच्या आयुष्यात अशा कथा आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. 

रुक्मिणीचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे २००७ मध्ये उरी येथे दहशतवाद्यांना रोखताना शहीद झाले. तर आई सुभाषिणी वसंत एक प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तकी आहेत. 

रुक्मिणीने लंडनच्या रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्टमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. सिनेमा आधी ती थिएटरमध्ये सक्रिय होती.कन्नडसोबत इंग्लिश, हिंदी, तमिळ बोलते. 

रुक्मिणी वसंतने २०१९ मध्ये बिरबल ट्रायलॉजीद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती अपस्टार्ट्स, सप्त सागरदाचा एलो - साइड ए अँड साइड बी, भैरथी राणागल या चित्रपटांमध्ये दिसली. 

ती अलीकडेच विजय सेतुपती यांच्यासोबत "एस" मध्ये दिसली आणि शेवटची ती ए.आर. मुरुगदास यांच्या "माधारासी" मध्ये शिवकार्तिकेयन यांच्यासोबत दिसली.

रुक्मिणी वसंतने तिच्या कामाने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे.  तिला अभिनयासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देखील मिळाला आहे. 

प्रभासच्या स्पिरिट या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या जागी सप्त सागरदाचे एलो या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रुक्मिणी वसंतला घेण्याची चर्चा सुरू आहे.

Click Here