पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचा रंग काय सांगतो? जाणून घ्या
पाण्याच्या बाटल्या खरेदी करता तेव्हा त्याचे झाकणं वेगवेगळ्या रंगाच्या असतात.
आपण नेहमी पिण्याच्या पाण्याच्या बाटली खरेदी करतो. या बाटल्यांच्या झाकणं चे रंग वेगवेगळे असतात. त्यामागे काही अर्थ असतात.
निळे झाकणं तुम्ही कदाचित निळ्या झाकणं असलेल्या बाटल्यांमधून पाणी प्यायले असेल. तुम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नसेल आणि फक्त तुमची तहान भागवली असेल.
खरं तर, या निळ्या रंगामागे एक लपलेला अर्थ आहे. या बाटलीतील पाणी एका झऱ्यातून येते, म्हणजेच ते मिनरल वॉटर आहे, हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हा निळा रंग दर्शवितो.
पांढरा रंग बाटलीच्या झाकणाचा रंग पांढरा असेल तर ते प्रक्रिया केलेलं पाणी आहे. म्हणजेच ते प्रोसेस्ड वॉटर आहे, असा त्याचा अर्थ होतो.
काळा रंग बाटलीला काळ्या रंगाचं झाकण लावलेलं असेल तर त्या बाटलीतलं पाणी हे अल्कलाइन आहे.
हिरवा रंग बाटलीचं झाकण हिरव्या रंगाचं असेल तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिसळून ते शुद्ध केलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी पाण्याची बाटली खरेदी करताना बाटलीच्या झाकणाचा रंग एकदा पाहा.
पिवळा रंग पिवळा रंग असलेलं झाकणं देखील मिळतात. या पिवळ्या झाकणं असलेल्या बाटल्यांमध्ये असलेल्या पाण्यात जीवनसत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात.