चॅटजीपीटी लोक कशासाठी वापरताहेत?

तुम्ही यापैकी कशासाठी चॅटजीपीटी वापरता?

'चॅटजीपीटी' हे आयतं टूल हातात आल्यानंतर त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पण लोक मुख्यतः कशासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात?

माहिती मिळवणं, व्यावहारिक मार्गदर्शन, विविध प्रकारचं लेखन, तांत्रिक मदत, अभिव्यक्ती आणि मल्टिमीडिया इत्यादी गोष्टींसाठी लोक चॅटजीपीटीचा अधिक वापर करतात.

माहिती मिळवण्यासाठी चॅटजीपीटीचा सर्वाधिक म्हणजे १८.३ टक्के वापर केला जातो. दुसरा क्रमांक आहे मजकूर संपादनाचा. त्यासाठी चॅटजीपीटीचा १०.६ टक्के वापर केला जातो.

ओपन एआय (सप्टेंबर २०२५)नुसार, सर्वाधिक वापर म्हणजे १८.३ टक्के विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी केला जातोय.

१०.६ टक्के लोक चॅटजीपीटीचा वापर मजुकर संपादित करण्यासाठी, १०.२ टक्के लोक शिकवण्यासाठी, ८.५ टक्के लोक सल्ला घेण्यासाठी वापर करतात.

८ टक्के लोक वैयक्तिक लेखनासाठी वापर करतात. तर आरोग्य, फिटनेस, सौंदर्य यासाठी ५.७ टक्के लोक वापर करतात. फोटो तयार करण्यासाठी ४.२ टक्केच लोक वापर करतात.

गप्पा मारण्यासाठी २ टक्के लोक वापर करतात. तर क्रिएटिव्ही आयडियासाठी वापर करणाऱ्या लोकांचे प्रमाण ३.९ टक्के इतकंच आहे.

मुलींना एसीची हवा का सहन होत नाही? कारण वाचून वाटेल आश्चर्य

Click Here