गाडीच्या टायरमध्ये हवेचं प्रेशर किती असावं?

गाडी चालवताना सुरक्षितता, चांगले मायलेज आणि टायरचा टिकाऊपणा यासाठी टायरमधील हवेचा दाब (Air Pressure) योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

गाडीच्या टायरमध्ये किती हवा असावी, हे प्रत्येक गाडीनुसार वेगळं असू शकतं. उदा. कार, दुचाकीसाठी वेगळं.

टायरमध्ये हवेचं प्रेशर किती असावं याची माहिती टायरवर पाहायला मिळते. किंवा फ्युएल लिडवर लावलेला स्टिकर तपासा.

कंपन्या या स्टिकरवर PSI (पाऊंड्स पर स्क्वेअर इंच) मध्ये योग्य आकडा नमूद करतात. (उदा. फ्रंट ३२ PSI, रियर ३० PSI).

टायरमध्ये हवा कमी असल्यास मायलेज कमी मिळतो, हँडलिंग बिघडते आणि टायर गरम होऊन पंक्चर होण्याची शक्यता वाढते.

जास्त हवा असल्यास, गाडी जास्त बाऊन्स होते, प्रवास आरामदायी राहत नाही आणि टायर लवकर खराब होतात.

टायरमधील हवा नेहमी गाडी थांबवून किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी, म्हणजेच टायर थंड असताना तपासावी.

लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी किंवा कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी प्रेशर तपासणे गरजेचे आहे.

मुख्य चार चाकांसोबतच स्पेअर टायरमधील हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासणे कधीही विसरू नका.

योग्य हवेचा दाब गाडीला सुरक्षितता, इंधनाची बचत आणि टायरला दीर्घायुष्य देतो.

Click Here