दहशतवाद्यांचे नवे हत्यार 'Session App'

'नो सिम, नो ईमेल' मेसेजिंग; दिल्ली स्फोटात Session App चा वापर

दिल्लीत झालेल्या स्फोटातील दहशतवादी डॉ. उमर नबी आणि तुर्कीयेतील त्याचा हँडलर 'UKasa' यांच्या संवादासाठी वापरले जाणारे 'Session App' आता चर्चेत आले आहे. 

Session ॲप हे प्रायवसीवर लक्ष केंद्रित करून बनवलेले एक 'फ्री' आणि 'ओपन-सोर्स' मेसेजिंग ॲप आहे. स्वित्झर्लंडच्या कंपनीने ते बनवले आहे.

या ॲपची टॅगलाइनच "Send Messages, Not Metadata" असा आहे. दहशतवादी याच खास फिचरमुळे त्याचा वापर करत होते.

Session ॲप वापरण्यासाठी युजरला नंबर किंवा ईमेल आयडीची गरज नसते. ॲप युजरला एक ID देते, ज्याद्वारे IP ड्रेस कधीही समोर येत नाही.

WhatsApp सारख्या ॲप्सवर प्रत्येक मेसेजचा मेटाडेटा तयार होतो आणि तो कंपनीच्या सर्व्हरवर जतन होतो. Session ॲप ही माहिती जतन करत नाही.

Session ॲप कोणत्याही एका कंपनीच्या सर्व्हरच्या नियंत्रणाखाली नसते. त्याचे नेटवर्क जगभरातील युजर्सनी चालवलेल्या सर्व्हर्सवर आधारित आहे. यामुळे कोणताही देश मेसेज ट्रॅक करू शकत नाही.

Session ॲप WhatsApp च्या तुलनेत ते कमकुवत आहे. यामध्ये व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलची सुविधा उपलब्ध नाही. फाइल शेअर करण्याची मर्यादा फक्त 10MB आहे.

Click Here