स्टार लिंकचे इंटरनेट भारतात सुरू होणार, किती रुपयांना मिळणार?

प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक ही जगभरात प्रसिद्ध आहे. 

स्टारलिंकचे इंटरनेट स्वस्त असेल असे अनेकांना वाटले होते. पण, हे इंटरनेट स्वस्त नाही.

भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रूपयांपासून सुरू होणार आहेत. हार्डवेअर किटसाठी युजर्सना तब्बल २४ हजार रूपये वेगळे भरावे लागणार आहेत.

सेटअप केल्यानंतर तुम्हाला स्टारलिंकची इंटरनेट सुविधा मिळण्यास सुरूवात होईल. कंपनीनं ३० दिवसांचा ट्रायल देखील दिला आहे.

सर्व्हिस ही ९९.९ टक्के अपटाईमसह येते. त्याचबरोबर कंपनीनं आमची इंटरनेट सेवा कधीही खंडीत होत नाही असा दावा देखील केला आहे.

स्टारलिंकची इंटरनेट सेवा ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून अॅक्सेस करता येते.

मस्क यांची ही इंटरनेट सेवा सॅटेलाईट बेस असल्यामुळं ते शक्य होतं असा दावा करण्यात आला आहे. 

स्टारलिंक फक्त घरगुती वापरासाठी इंटरनेट सुविधा पुरवत आहे. यासाठी कंपनी वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. Starlink चा Roam प्लॅन देखील आहे. 

स्टारलिंक फक्त घरगुती वापरासाठी इंटरनेट सुविधा पुरवत आहे. यासाठी कंपनी वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. Starlink चा Roam प्लॅन देखील आहे. 

Click Here