हा आजार प्रामुख्याने तरुण वयात होतो.
केराटोकोनस हा डोळ्यांचा आजार आहे, ज्यात कॉर्निया (डोळ्याचा बाह्य भाग) हळूहळू पातळ होऊन गोल आकाराऐवजी शंकूच्या आकारासारखा होतो.
कॉर्नियाच्या या विकृतीमुळे प्रकाश योग्यरित्या केंद्रित होत नाही, त्यामुळे दृष्टी धूसर व वाकडी दिसू लागते.
हा आजार प्रामुख्याने तरुण वयात (15 ते 30 वर्षे) सुरू होतो आणि हळूहळू वाढत जातो. बहुतांश वेळा दोन्ही डोळ्यांवर परिणाम होतो.
वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, धूसर दिसणे, रात्री नीट दिसत नाही, प्रकाशाच्या भोवती वलय दिसणे ही याची लक्षणे आहेत.
याच्या कारणांमध्ये अनुवांशिक, डोळे सतत चोळणे आणि कॉर्नियाची नैसर्गिक कमकुवत रचना असू शकतात.
रायबोफ्लेविन आणि यूव्ही प्रकाशाच्या साहाय्याने केलेली कॉर्नियल कोलेजन क्रॉस-लिंकिंग प्रक्रिया कॉर्निया मजबूत करुन आजार थांबवते.
काही रुग्णांमध्ये लेझर ट्रीटमेंटद्वारे कॉर्नियाचा आकार सुधारला जातो, ज्यामुळे दृष्टी अधिक स्पष्ट होते.
वेळेत निदान आणि उपचार झाले, तर केराटोकोनस अंधत्वापर्यंत पोहोचत नाही आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.