"ठाकरे आये हैं, सिंहासन खाली करो"

महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेल्यांनी आवराआवर करायला घ्या

तब्बल २० वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु असताना अखेर विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले.

यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दोन्ही नेत्यांची भाषणे सुरु असताना संजय राऊत हे पडद्यामागे एका खोलीत बसून हा सर्व कार्यक्रम पाहत होते.

राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला आहे, संवाद असल्यामुळेच हे घडू शकतं असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तेत जे शत्रू भेटले आहेत त्यांनी आता आवराआवर करायला घ्यायला हवी. सिंहासन खाली करो ठाकरे आये हैं अशी घोषणा आम्ही देणार आहोत.

बाळासाहेब जिथे आहेत तिथून हा सोहळा ते पाहत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय

Click Here

Your Page!