मोबाईल वेळेत अपडेट करत नाही? होईल तोटा

आपल्या मोबाईलला अनेकवेळा बरेच अपडेट येतात.

सध्या मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हजारो रुपये खर्च करुन आपण मोबाईल घेतो. आपल्या फोनची काळजी घेणे महत्वाचे आहे. 

 लोक आपल्या ऑफिसपासूनची सगळीच काम आपल्या फोनमध्ये करतात. त्यामुळे फोन खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. 

लोक स्मार्टफोनमध्ये येणारे अपडेट्स दुर्लक्ष करतात किंवा लोकांना हे नवीन अपडेट्स नकोसे वाटतात. आणि हीच छोटीशी चूक मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

मोबाइल कंपन्या नियमितपणे सिक्युरिटी पॅच अपडेट्स जारी करतात जेणेकरून फोनला हॅकर्स आणि व्हायरसपासून सुरक्षित ठेवता येईल. जर तुम्ही हे अपडेट्स इंस्टॉल केले नाहीत, तर फोनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. 

अपडेट्समध्ये फक्त सुरक्षा सुधारणा होत नाही तर अनेकदा नवे फीचर्स आणि सुधारित सुविधा देखील मिळतात. 

जर तुम्ही फोन अपडेट केला नाही, तर नवीन फीचर्स तुमच्या डिव्हाईसमध्ये येणार नाहीत आणि तुम्ही जुन्याच वर्जनमध्ये अडकून राहाल.

बहुतेक ॲप्स हे नवीन सॉफ्टवेअर वर्जनसाठी डिझाइन केले जातात. तुमचा फोन अपडेट नसेल, तर ॲप्स वारंवार क्रॅश होऊ शकतात किंवा सुरूच होणार नाहीत.

अपडेट्समध्ये बॅटरीची कार्यक्षमता आणि प्रोसेसरची परफॉर्मन्स सुधारण्यासाठी बदल केलेले असतात. अपडेट्स टाळल्यास फोनची बॅटरी लवकर संपते आणि फोन स्लो होण्याची शक्यता वाढते.

जुन्या वर्जनमध्ये अनेकदा बग्स असतात, ज्यामुळे फोन हँग होतो किंवा डेटा गायब होऊ शकतो. नवीन अपडेट्स हे बग्स दुरुस्त करतात.

Click Here