बाजारात कितीही ब्रॅण्डेड तूप मिळो, पण घरचं तूप म्हणजे खऱ्या अर्थाने सुवासिक आणि पोषक...
तूप तयार करण्याची पहिली पायरी - साय जमा करादररोजच्या दुधावरची साय एका भांड्यात जमा करा आणि ती फ्रिजमध्ये ठेवा. साधारण ८ दिवस साय जमा करा.
साय विरजण्यासाठी तयार करासायीचं भांडं बाहेर काढा, त्यात दोन चमचे दही टाका आणि रात्रभर विरजायला ठेवा.
सायीचं दही तयार झाल्यावर… दही मोठ्या भांड्यात घेऊन त्यात त्याच्या दिडपट पाणी घाला. रवी किंवा मिक्सरने ढवळत रहा, जोपर्यंत लोणी आणि ताक वेगळं होत नाही.
लोणी कढवायला ठेवा वेगळं झालेलं लोणी पातेल्यात जमा करा आणि गॅसवर कढवायला ठेवा. आता सुरू होतो सुवासिक तुपाचा प्रवास
मीठ टाका लोणी कढवताना चिमूटभर मीठ टाकल्याने तूप छान रवाळ आणि खमंग होतं.
विड्याचं पान कढवताना एक विड्याचं पान टाका. यामुळे तूपाचा रंग सुंदर येतो आणि ते अधिक सुगंधी होतं.
पाणी शिंपडा तूप तयार झालं का ते तपासण्यासाठी थोडं पाणी शिंपडा. तडतड आवाज आला, म्हणजे तूप तयार
तूपाचा रंग ठरवा आपल्या पसंतीने खमंग तूप हवंय? थोडं जास्त कढवा. शुभ्र तूप हवंय? गॅस लवकर बंद करा.
घरचं तूप ... आरोग्य आणि स्वादाचं सोनं घरच्या हाताने बनवलेलं तूप म्हणजे पोषण, सुवास आणि घरगुती प्रेमाचा संगम