वाढत्या वजनाला बसेल आळा, सब्जा सीड्सचे आहेत असंख्य फायदे
शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देण्याचं काम सब्जा सीड्स करतं. त्यामुळे उन्हाळ्यात खासकरुन सब्जाचं सेवन केलं जातं.
सब्जा सीड्समुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते. सब्जा पाण्यात भिजवल्यामुळे तो पाणी शोषून घेतो आणि त्यानंतर हळूहळू शरीराला ते पाणी पुरवतो.
सब्जामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास सब्जाचं सेवन करावं.
सब्जामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ यांसारख्या तक्रारी दूर होतात.
सब्जा सीड्स पाण्यात भिजवल्यावर मूळ आकाराच्या सुमारे ३० पट पर्यंत फुगतात. जेवण करण्यापूर्वी हे खाल्ल्यास पोट भरल्याची भावना येते.
सब्जा सीड्स रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) स्थिर ठेवण्यास मदत करतात.