तुमचा लॅपटॉप स्लो आहे का? या ट्रिक वापरुन स्पीड वाढवा
अनेकदा आपल्या लॅपटॉपचे स्पीड कमी येते. यामुळे काम करताना अडचणी येतात.
जर तुमचा लॅपटॉप स्लो झाला असेल तर काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला काही उपयुक्त युक्त्या सांगणार आहोत. यामुळे तुमच्या लॅपटॉपचे स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते.
लॅपटॉपचा स्पीड कमी असण्याची एक नाही तर अनेक कारणे आहेत.
तुमचा हार्ड ड्राइव्ह SSD ने बदला, कारण SSD जलद असतात.
कमी रॅममुळे तुमचा लॅपटॉप स्लो होऊ शकतो. चांगल्या कामगिरीसाठी रॅम वाढवा.
तुमच्या लॅपटॉपमधून ज्या फाइल्स आणि प्रोग्राम्सची तुम्हाला आता गरज नाहीये ती काढून टाका.
हे तुमच्या लॅपटॉपचे स्पीड देखील कमी करू शकते. अँटीव्हायरस वापरून तुमच्या डिव्हाइसमधून व्हायरस काढून टाका.
टेम्प फाइल्स तुमच्या लॅपटॉपला स्लो देखील करू शकतात. Ctrl+R दाबा आणि %temp% शोधा. तुम्हाला टेम्प फाइल्स सापडतील. त्या डिलीट करा.