स्टेटस आवडलं तर लगेच डाऊनलोड करा

WhatsApp वर नवीन फीचरमुळे युजर्सना स्टेटस शेअर आणि कंट्रोल करता येणार आहे. 

फेसबुक किंवा इन्स्टावर कसं एखाद्याची स्टोरी किंवा स्टेटस आवडलं की लगेच रिशेअर करता येते किंवा डाऊनलोड करता येते, मात्र WhatsApp अजूनही एखादे स्टेटस आवडले की त्या व्यक्तीकडून ते मागून घ्यावे लागते.

ते डाउनलोड करण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागतो. मात्र आता हा त्रास संपणार आहे. WhatsApp वर तुम्हाला आवडलेलं स्टेटस तुम्ही अगदी सहज डाऊनलोड करु शकता. 

WhatsApp स्टेटसबाबत कंपनीने मोठी अपडेट दिली आहे. सध्या एका नव्या फीचरवर कंपनी काम करत आहे. हे फीचर अँड्रॉइड अॅपवर मिळणार आहे. 

स्टेटसवर जास्त कंट्रोल असेल असं कंपनीचं म्हणणं आहे. मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवर खास फीचर अॅड करणार आहे. आता तुम्ही एकाच वेळी फेसबुक आणि WhatsApp वर देखील स्टेटस शेअर करु शकणार आहात.

थोडक्यात स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीनं ठरवायचं आहे की आपले स्टेटस कोण पाहणार, कोण शेअर करू शकणार. 

सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही एखादे स्टेटस ठेवले तर ते कोणी रिशेअर करायचे याचे सिलेक्शन देखील तुम्हाला करावे लागणार आहे.

तुम्हा ज्या व्यक्तींना ही रिशेअर करायची परवानगी द्याल तेच लोक तुमचे स्टेटस डाऊनलोड करु शकणार आहेत.

थोडक्यात इन्स्टाग्राम सारखी सुविधा WhatsApp वर मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा युझर्सना होणार आहे. ऑथरकडे किंवा ओरिजनल स्टेटस ठेवणाऱ्याकडे ते अधिकार असतील.

हे फीचर बाय डिफॉल्ट ऑफ असेल. युजरला हे फीचर मॅन्युअली सुरू करावं लागणार आहे. बहुतेक नव्या अपडेटमध्ये हे फीचर मिळण्याची शक्यता आहे.

हे फीचर बाय डिफॉल्ट ऑफ असेल. युजरला हे फीचर मॅन्युअली सुरू करावं लागणार आहे. बहुतेक नव्या अपडेटमध्ये हे फीचर मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच अँड्रॉइड युजर्सना देखील ते वापरण्याची संधी मिळेल. युजर्सला स्टेटस शेअर करायचा पर्याय दिला आहे. फक्त अट एकाच ठेवली आहे.

Click Here