महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आता E-KYC बंधनकारक केली आहे. लाभार्थी महिला घरबसल्या पोर्टलद्वारे इ-केवायसी करू शकतात.
लाभार्थी महिलांना दोन महिन्यांच्या आत आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल.
www.ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन “e-KYC” बॅनरवर क्लिक करा, आधार क्रमांक आणि Captcha टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
यानंतर प्रणाली तपासेल की, तुमची KYC आधीच पूर्ण झाली आहे का. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.
पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की, नाही हे तपासले जाईल.
यानंतर लाभार्थी महिलांनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच Captcha Code नमूद करावा. आपला जात प्रवर्ग निवडून पुढील बाबी प्रमाणित कराव्या.
1- कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनात कार्यरत नाहीत.
2- माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करुन Submit बटण दाबावे. शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
लाभार्थी महिलांनी पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आहे.