थालापती विजय यांची संपत्ती किती? 

थालापती विजय सध्या चर्चेत आले आहेत.

दक्षिणेकडील सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेट्री कळघम’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष थलापती विजय सध्या एका मोठ्या आणि हृदयद्रावक घटनेमुळे चर्चेत आले आहेत.

शनिवार रोजी तामिळनाडूतील करूर येथे आयोजित केलेल्या त्यांच्या एका जाहीर सभेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.

गर्दी आणि उष्णतेमुळे झालेल्या गोंधळात २९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

सभेदरम्यान अचानक गर्दीतील लोकांना अस्वस्थ वाटू लागले आणि अनेक लोक जागेवरच कोसळले. 

तात्काळ त्यांना करूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि जवळील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

विजयची एकूण संपत्ती ६०० कोटी असल्याचा अंदाज आहे.

चेन्नईतील नीलनकराई येथे कॅसुरीना ड्राईव्हवर विजयचा एक आलिशान बंगला आहे. 

जाहिराती आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्याची वार्षिक कमाई १०० ते १२० कोटींच्या घरात आहे.

विजयकडे Rolls Royce Ghost २.५ कोटी, BMW X5 आणि X6, Audi A8 L, Range Rover Evoque ६५ लाख यांसारख्या अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांचे राजकारण आणि जनमानसातील स्थान गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. 

Click Here