दि. बा. पाटील – भूमिपुत्रांचा आवाज!

जाणून घ्या कोण होते गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारे दि. बा. पाटील

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याच्या मागणी भूमिपुत्रांनी केली असून त्यासाठी त्यांचाच वारसा अनेकांनी चालवला.

माजी खासदार, आमदार व पनवेल नगराध्यक्ष दिनकर बाळू पाटील हे रायगड जिल्ह्यासहीत संपूर्ण महाराष्ट्राला दि.बा. पाटील नावाने परिचित आहेत. जमिनीच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

१३ जानेवारी १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातल्या जासई गावात दि. बा. पाटील यांचा जन्म झाला. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिक्षक आणि शेतकरी होते.

शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून पनवेल नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पहिली ओळख निर्माण केली. दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. 

सिडको प्रकल्पासाठी जमीन घेतली जात असताना दि. बा. पाटील शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढले. गोळीबारात जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले.

या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला पण दि. बा. पाटील मागे हटले नाहीत. त्यांनी सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.

दि. बा. पाटील यांची भाषणे ऐकायला गर्दी व्हायची. विरोधक देखील त्यांच्या आवाजाला घाबरायचे. अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा, कर्मकांड यांना त्यांनी नेहमीच विरोध केला.

२५ जून २०१३ रोजी हृदयविकाराने दि. बा. पाटील यांचे निधन झाले. पण त्यांची लढाऊ वारसा आजही जिवंत आहे.

Click Here