आपल्याकडे अनेक जण उपवासा दिवशी ड्रायफ्रूट्स खातात.
कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक जण नऊ दिवस उपवास करतात.
उपवासादिवशी फळे खातात. पण, अनेक जण ड्रायफ्रूट्स खातात.
एका संशोधनानुसार ड्राय फ्रूट्स सुपर फूडपेक्षा कमी नाहीत. ते शरीरासाठी उपयुक्त असते.
ड्राय फ्रूट्सचे फायदे आयुर्वेदिक दृष्टीकोनातून खूप आहेत.
एनर्जी लो झाली तर अशा वेळी देखील ड्राय फ्रूट्सचं सेवन केलं जातं. असेही मानले जाते की कोरड्या फळांचे सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन राखण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार ड्राय फ्रूट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अंजीर आणि खजूर यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.
ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शारीरिक शांती मिळते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. अक्रोड आणि बदाम यांसारख्या ड्राय फ्रूट्सचं सेवन केल्याने ते शरीरासाठी चांगले मानले जातात .