प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवण्याचे तोटे

चुकूनही प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊ नका भाजी! 

बाजारातून आणलेल्या भाज्या आपण फ्रिजमध्ये स्टोर करतो. यात अनेक जण प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवतात.

प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवल्यामुळे एकतर ती लवकर खराब होते. तसंच त्याच्यामुळे  शरीरालाही अनेक तोटे सहन करावे लागतात.

प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवल्यामुळे ठराविक वेळेनंतर पिशवीत ओलावा निर्माण होतो. ज्यामुळे भाजी लवकर सडते.

बंद पिशवीत हवा खेळती न राहिल्यामुळे भाजीतील पोषकतत्व, जीवनसत्त्व आणि खनिजे नष्ट होतात.

दीर्घकाळ प्लॅस्टिकच्या संपर्कात राहिलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरात हानिकारक रसायने जमा होतात. काही अभ्यासांनुसार, यामुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीये? मग प्या शेळीचं दूध

Click Here