WhatsApp वर DP बदलणे होणार स्मार्ट; इन्स्टाग्रामवरुन घेता येणार

WhatsApp वापरकर्त्यांना नेहमी नवीन फिचर लाँच करत असते.

WhatsApp जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे.मेटा नेहमी यामध्ये अपडेट देत असते.

प्रोफाइल फोटो (डीपी) बदलण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे युजर्स त्यांचे प्रोफाइल फोटो थेट इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरून इम्पोर्ट करू शकतील.

हे नवीन फीचर अँड्रॉइड व्हर्जन 2.25.21.23 साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये दिसले आहे आणि काही बीटा यूझर्सना त्याचे अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत, व्हॉट्सअॅपवर डीपी सेट करण्यासाठी, युजर्सना गॅलरीमधून फोटो निवडायचा होता, कॅमेऱ्याने त्यावर क्लिक करायचा होता, अवतार जोडायचा होता किंवा एआय जनरेटेड इमेज वापरायची होती.

जर एखाद्याला त्यांचा फेसबुक किंवा इंस्टाग्राम फोटो टाकायचा असेल तर त्यांना प्रथम स्क्रीनशॉट घ्यावा लागत होता किंवा फोटो डाउनलोड करावा लागत होता - ज्यामुळे फोटोची गुणवत्ता देखील खराब झाली.

 "सिंक फीचर" ही समस्या दूर करेल. जेव्हा यूझर्स व्हॉट्सअॅपवरील प्रोफाइल फोटो बदलण्यासाठी एडिट पर्यायावर जातात, तेव्हा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून फोटो आयात करण्याचा एक नवीन पर्याय दिसेल.

या फीचरचा फायदा घेण्यासाठी, यूझर्सना त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी लिंक करावे लागेल. मेटाने या वर्षाच्या सुरुवातीला अकाउंट्स सेंटरमध्ये व्हॉट्सअॅप जोडण्याची सुविधा दिली होती.

आता इंस्टाग्राम स्टेटस थेट व्हॉट्सअॅपवर शेअर करता येते आणि बिझनेस अकाउंट्स त्यांच्या इन्स्टा प्रोफाइलमध्ये व्हॉट्सअॅप बटण देखील जोडू शकतात.

हे नवीन फीचर त्या यूझर्ससाठी खूप फायदेशीर ठरेल ज्यांना तिन्ही मेटा प्लॅटफॉर्मवर (इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप) समान प्रोफाइल पिक्चर ठेवायचा आहे. 

Click Here