सध्या धकाधकीचे जीवन आहे. अनेकांच्या शरीराच्या तक्रारी असतात. प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. पण नेमकं काय करायचे हे माहित नाही. दररोज चालण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
दररोज चालण्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोट दुखण्याचा त्रास होत नाही.
दररोज चालण्याने चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होण्यास मदत होते.
दररोज चालण्याने ताण कमी होतो. शांत झोप लागते.
दररोज चालण्याने शरीर सक्रिय आणि ऊर्जावान राहते. यामुळे दररोज चालणे हे गरजेचे आहे.