हा धबधबा Taylor Glacier मधून वाहतो. East Antarctica, McMurdo Dry Valleys इथे वाहताे.
पहिल्यांदा १९११ मध्ये वैज्ञानिक Thomas Griffith Taylor यांनी हा धबधबा पाहिला. तेव्हापासून तो रहस्यच मानला गेला.
सुरुवातीला लोकांना वाटलं, हा लाल रंगाच्या शेवाळ्यामुळे (Algae) असेल. पण तसं निघालंच नाही.
खरं कारण आहे, लोखंडाने समृद्ध खारट पाणी (Iron-rich salty water) जेव्हा हवेच्या संपर्कात येतं तेव्हा ते गंजतं.
गंजामुळे पाण्याला लालसर रंग येतो. म्हणून ते धबधब्यासारखं रक्त वाहत असल्यासारखं दिसतं.
हे पाणी सुमारे ५० लाख वर्षं जुना खाऱ्या पाण्याचा साठा आहे. तो ग्लेशियरखाली अडकलेला होता.
इथे प्रचंड थंडी, सूर्यप्रकाश नाही, आणि ऑक्सिजन फार कमी. तरीही सूक्ष्मजीव (Microbes) तग धरून जगतात.
Blood Falls शास्त्रज्ञांसाठी खास आहे, कारण इथलं जीवन आपल्याला मंगळ किंवा इतर ग्रहांवरच्या जीवनाची शक्यता समजून घ्यायला मदत करतं.