Tap to Read ➤
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ९ किल्ले पाहिलेच पाहिजे
महाराष्ट्रातील किल्ले हे इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना अनेक किल्ले जिंकले आणि काही नवीन किल्ले बांधले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.
तोरणा : शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना घेतलेला हा पहिला किल्ला आहे.
सिंहगड : तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष हा किल्ला देतो.
विजयदुर्ग : उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असणारा हा दुर्ग आजही सुस्थितीत उभा आहे. या किल्ल्यामुळे मराठा आरमाराला खूप मदत झाली.
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी याच किल्ल्यावर बांधली.
प्रतापगड : छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात ऐतिहासिक लढाई या किल्ल्यावर झाली.
लोहगड किल्ल्याचा इतिहास फार प्राचीन आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा हिल स्टेशनजवळ आहे.
जंजिरा : या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या असून कायम अभेद्य आणि अजिंक्य राहिला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये पन्हाळा किल्ला जिंकला. नंतर सिद्दी जोहरने १६६० मध्ये वेढा घातला.
क्लिक करा