कपडे धुण्यासाठी काही सोप्या युक्त्या वापरल्यास तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकते.
काहीवेळा कपडे धुण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि कंटाळवाणी वाटू शकते.
कपडे धुताना पाण्यात व्हाईट व्हिनेगर घातल्यास, कपडे मऊसूत राहतात व घामाची दुर्गंधी निघून जाते.
रंग जाणारे किंवा गडद रंगाचे कपडे नेहमी आतली बाजू बाहेर काढून धुवावेत. यामुळे त्यांचा रंग दीर्घकाळ टिकून राहतो.
कपडे धुताना त्यात बेकिंग सोडा घाला, यामुळे पांढरे कपडे कायम पांढरेशुभ्र व चमकदार राहतात.
शर्ट धुतल्यावर नेहमी हॅंगरवरच वाळत घालावा, यामुळे त्यावर सुरकुत्या पडत नाहीत तसेच वारंवार इस्त्री करण्याची गरज भासत नाही.
ड्रायरमध्ये सुके नॅपकिन घातल्याने तो ओल्या कपड्यांचा ओलावा शोषून घेऊन, कपडे लवकर वाळवण्यास मदत करतो.
कपडे धुताना कपड्यांवर सुरकुत्या पडू नये म्हणून मशीन ड्रममध्ये ५ ते ६ बर्फाचे खडे घालावेत.
वॉशिंग मशिनमधून कुबट दुर्गंधी येत असेल त्यात गरम पाणी आणि व्हिनेगर घालावे, यामुळे दुर्गंधी निघून जाते.
रंग जाणारे किंवा गडद रंगाचे कपडे पहिल्यांदा धुताना पाण्यात मीठ घालावे, यामुळे रंग कपड्यांवर टिकून राहतो.
तेलाचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि डिश वॉश लिक्विडची पेस्ट लावावी, यामुळे डाग निघून जातात.