तुम्ही मातीच्या भांड्यात दही साठवता की स्टीलच्या भांड्याचा वापर करता ? काय जास्त फायदेशीर असतं ?
मातीच्या भांड्यात दही साठवून ठेवल्यास ते दही पटकन तयार होऊ शकतं
मातीच्या भांड्यात दही जमवायचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते दही जाड तयार होते याचे कारण मातीपासून बनवलेली भांडी पाणी शोषून घेतात, ज्यामुळे दही दाट, जाड होते.
स्टील किंवा ॲल्युमिनियमऐवजी मातीच्या भांड्यात दही लावल्यास शरीराला लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम व कॅल्शियम अशी नैसर्गिक खनिजे मिळतात.
जेव्हा मातीच्या भांड्यात दही साठवले जाते तेव्हा त्याला मातीसारखा वास येऊ लागतो, ज्यामुळे दह्याची चव आणखीन चांगली लागते.
मातीचे भांडे दह्यातील आम्लयुक्त घटक शोषून घेते त्यामुळे ते दह्याला अल्कलाइन बनवत नाही.
मातीच्या भांड्यात दही लावल्याने कालांतराने दही आंबण्याची प्रक्रिया ही लांबवली जाते, ज्यामुळे दही लवकर आंबट होत नाही.
मातीचे भांडे हे पूर्णपणे नैसर्गिक असते ते बनवताना त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे यात लावलेल्या दह्याची चव ही नैसर्गिक असते.
मातीच्या भांड्यात दही लावल्याने त्यातील प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वाढतात. प्रोबायोटिक्स आपली पचन आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारतात.
मातीच्या भांड्यात लहान छिद्रे असतात जी दह्याचा ओलावा टिकवून ठेवतात त्यामुळे आवश्यक पोषक घटक टिकून राहतात.